ग्राम आधार संस्थेचे ध्येय जरी अनेक असले तरी मुख्य ध्येय हे बौद्धिक अक्षम , ऑटीझम , सेरेब्रल पल्सी , शारीरिक अपंग यांना सुविधा उपलब्ध करून देणे आहे . जीवन ज्योती विशेष शाळा ही विशेष बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांसाठी जरी असली तरी तेथे मिळणारी वैद्यकीय सुविधा इतर दिव्यांगांसाठी ही उपलब्ध आहे ....
1. ग्राम पंचायत 5% दीव्यांग राखीव निधी :
जीवन ज्योती विशेष शाळा तसेच तालुक्यातील इतर दिव्यांगाना मिळणारा निधी हा सरकार चा छान उपक्रम आहे . परंतु हा निधी अनेक ठिकाणी मिळत नाही , किंवा अनेक ग्राम पंचायत मध्ये माहिती नसतो . तर हा निधी योग्य ठिकाणी खर्च व्हावा , व मिळणारा निधी पूर्ण मिळतो आहे ना ह्याची खात्री करून दिव्यांगांना ह्या स्कीम चा उपयोग होईल ह्या साठी कार्यरत राहणे .....
2. निरामय योजना :
राष्ट्रीय न्यास , दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग , सामाजिक न्याय व अधिकारित मंत्रालय, नवी दिल्ली अंतर्गत बुध्दीबाधित दिव्यांगजणांसाठी निरामय आरोग्य विमा काढण्याची योजना राबविली जाते . रू ५००/- प्रीमियम म्हणजेच वार्षिक हप्ता भरून १ लक्ष रू. पर्यंतचा वैद्यकीय , शल्य चिकित्सा , थेरपी , दंत चिकीत्सा , बाह्य रुग्ण तपासणी , रक्त तपासणी, औषध, यातायात यासाठीचा क्लेम करता येतो असे या योजनेचे स्वरूप आहे . निरामय कार्ड साठीचे आवेदन करिता देणे , कार्ड आले का ते तपासणे , आलेले कार्ड लाभार्थ्यांना कळवणे, त्याची प्रत काढून देणे तसेच त्याची सॉफ्ट कॉपी मोबाईल वरती पाठवणे आणि लाभार्थ्यांना क्लेम करण्यासाठी साहाय्य करणे व ते निकाली निघे पर्यंत पाठपुरावा करणे, त्रुटींची पूर्तता करणे अशी सेवा दिली जाते ....
३. UDID कार्ड :
दिव्यांग व्यक्तीसाठी युनिक आयडी Unique Disability Identity Card (UDID) म्हणजे वैश्विक कार्ड हा प्रकल्प PWD साठी राष्ट्रीय डेटा बेस तयार करण्यासाठी आणि प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला एक अद्वितीय अपंगत्व जारी करण्याच्या दृष्टीकोनातून राबविला जात आहे . ग्राम आधार स्वयंसेवी संस्थे मार्फत UDID कार्ड ची यशस्वी अंमलबजावणी होण्यासाठी दिव्यांगाना संपर्क करून जागरूक करणे , कार्ड साठी लागणारे कागद पत्र घेऊन , स्कॅन करून संकेतस्थळवर अपलोड करून पावती दिली जाते . संकेतस्थळवर अर्ज ट्रॅक केला जातो व त्याची स्थिती बद्दल लाभार्थ्यांना माहिती दिली जाते. व हे काम संस्थे मार्फत माफक दरात केले जाते....
४. थेरपी :
जीवन ज्योती विशेष शाळेमध्ये भौतिक उपचार physiotherapy , व्यवसाय उपचार occupational therapy , वाचा उपचार speech therapy , योगा या सेवा नित्य दिल्या जातात . वरील विषयातील तज्ञ थेरपिस्ट विशेष शाळेत सेवा देतात. थेरपी साठी माफक शुल्क आकारले जात असेल तरी , ज्यांना परवडत नाही त्यांना संस्थे मार्फत शाळेला दिल्या जाणाऱ्या निधी तून मोफत दिली जाते . तसेच ने - आण करण्याकरिता विशेष एस टी महामंडळ यांच्या साहाय्याने कमी खर्चात यातायात करता यावी ह्या साठी बस ची व्यवस्था करण्यात आली आहे . कधी कधी जर सेवार्थी आर्थिक दुर्बल घटकातील असेल तर यातायात शुल्क ही संस्था निधीतून मोफत दिले जाते .
५. पालकांना संपर्क करणे ,थेरपी व योजनांबाबत पाठ पुरावा करणे.
६. दिव्यांगाना स्वतंत्र शिधा पत्रिका देण्यात यावी व त्या अनुषंगाने शिधा पत्रिकेवर अनुज्ञेय असणारा लाभ मिळविण्यासाठी पाठपुरावा करणे.
७. दोन महिन्यातून एकदा दिव्यांगांकरीता वैद्यकीय शिबिराचे आयोजन करणे.
८. बौद्धिक दीव्यांगाना फिट्स ( epilepsy) येण्याचे प्रमाण अधिक असते व त्यांचा औषधांचा मासिक खर्च साधारणपणे २०००/- ते २५००/- होतो. त्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सालय कडून व इतर देणगीदार यांच्या कडून औषधे मिळवण्यासाठी पाठपुरावा करणे....
Product Order / Enquiry
Your product purchase interest motivates our special student