दिव्यांग (बौद्धिक अक्षम) विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण,
निर्माण करू त्यांचे स्वतःचे नेतृत्व.......
ग्राम आधार स्वयंसेवी संस्था चिपळूण ही संस्था गुहागर तालुक्यातील बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन , विशेष विद्यार्थ्यांचे वैद्यकीय व शिक्षण यातून न होणारी प्रगती प्रकर्षाने जाणवते. त्या करिता संस्थेने विशेष लक्ष घेऊन या विशेष विद्यार्थांना स्व नेतृत्वाने जगण्याकरिता वैद्यकीय व शिक्षण एकाचं ठिकाणी मिळावे ह्या करिता सन २०१६ साली गुहागर शृंगारतली येथे जीवन ज्योती विशेष शाळा सुरू केली ...
परंतु १८ वर्षांनंतर विशेष विद्यार्थांना उत्पन्नाचे साधन काय ? हा प्रश्न समोर असताना सन २०२२ रोजी शाळेतली विशेष विद्यार्थांना घेऊन दिवाळी निमित्त आकाश कंदील तयार केले व त्यांची विक्री करून रोख रक्कम १५०००/- इतकी कमाई केली . हा दिवस एक बौध्दिक अक्षम विद्यार्थ्यांसाठी व संस्थेसाठी आनंददायी दिवस ठरवून आपण मुलांसाठी रोजगार व प्रशिक्षण उपलब्ध करू शकतो हे प्रकर्षाने जाणवले . ह्या मध्ये ५०% रक्कम बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांना मोबदला म्हणून देऊन उर्वरित सर्व रक्कम गुंतवून संस्थेचे मार्च २०२३ साली गुहागर तालुक्याच्या तहसीलदार मॅडम मा. प्रतिभाजी वराळे यांच्या हस्थे उद्घाटन केले व व्यवसाय प्रशिक्षण वर्गाची नवीन सूरवात केली . त्या नंतर मागे वळून न पाहता संस्थेने घर स्वच्छता , फुलांचे हार तयार करणे , लाकडी घान्याचे खोबरेल तेल , गाईच्या शेणापासून पणती , फिनेल , आकाश कंदील , डिश वॉश लिक्वीड असे अनेक प्रशिक्षण वर्ग सुरू केले . गुहागर तालुक्यातील विशेष विद्यार्थ्यांनी सहभागही घेतला . विशेष म्हणजे हा वर्ग प्रत्येक आठवड्यातून ३ दिवस असतो . परंतु काही उपक्रम हे घरगुती कामाचे प्रशिक्षण असून ते ही दिले जाते
1. परिसर स्वच्छता :
जीवन ज्योती विशेष शाळेत स्वच्छतेला फारच महत्त्व दिले जाते . यानुसार शाळेतील विशेष मुलांना त्याचे महत्त्व पटवून दिले आहे . त्याचे ते तंतोतंत पालन करतात. परिसरात झाडजुड करणे , कचरा जमा करून तो योग्य जागी जमा करणे , कुजवणे , झाडांच्या कुंड्या व्यवस्थित ठेवणे , परिसरातील फळ झाडांची काळजी घेणे , खत पाणी देणे इत्यादी....
२. स्वयंपाक पूर्व तयारी :
विशेष विद्यार्थ्याची क्षमता पाहून स्वयंपाक पूर्व तयारी घेतली जाते जसे की भाज्या निवडणे , भाज्या चिरणे , लसूण सोलणे , कणिक मळणे , जेवणाचे ताट लावणे , भोजन वितरित करणे , पाणी पिण्यासाठी पेले भरून ताटाच्या शेजारी डाव्या बाजूला ठेवणे. इत्यादी..
ग्राम आधार स्वयंसेवी संस्थेचा हा पुढाकार व बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांसाठी असलेली धडपड प्रत्येक्षात दिसून येते. आपणही जरूर भेट द्यावी व कायमचे ग्राहक व्हावे. ही संस्थेकडून आग्रहाची विनंती ......
Special Child Making Product Stall
Product Order / Enquiry
Your product purchase interest motivates our special student