दिव्यांग व्यक्ती आपण म्हंटले तर अनेक विचार मनात येते ती म्हणजे सहानभुती . कारण समाजात दिव्यांग व्यक्ती काही करूच शकत नाही, ही मानसिकता आधीच आपली ठरलेली असते . परंतु त्यांना स्वावलंबन बनवणे किती गरजेचे आहे हे बघता क्षणी दिव्यांग मुले यांच्या समोरील आव्हाने आपण बघणार आहोत . पहिल्यांदा दिव्यांगांचे वर्गीकरण बघू . राईट टू डीस्याबिलिटी ॲक्ट २०१६ मध्ये खालील दिव्यांगांचे वर्गीकरण करण्यात आले . १) अंध २) मस्कुलर डिस्ट्राफी ३)सिकल सेल ४) बौद्धिक दिव्यांगता ५) थेलीसिमीया ६) कुष्ठरोग मुक्त व्यक्ती ७) मेंदूचा पक्षघात (cerebral palsy ) ८) स्वपरायणता स्पेक्ट्रम विकार ९) मानसिक रुग्ण १०) बोलता न येणे ११)बुटका १२) शैक्षणिक अक्षमता १३) पार्कीन्सन रोग १४) अल्पदृष्टी १५) बहु स्केलेरोसिश्र १६) कर्णबधिर १७) हिमोफिलिया १८) श्रवण बाधित १९) तेजाबी आक्रमण ....
असे अनेक प्रकार दिव्यांगांचे आहेत. परंतु वैद्यकीय सुविधा शहरी ठिकाणी म्हणजेच जिथे आर्थिक दृष्ट्या सबल भाग आहे तिथे खूप आहेत . परंतु गाव
आणि आर्थिक दृष्ट्या सबळ शहरी भाग नाही आहे तिथे मात्र वैद्यकीय सुविधा नाही च्या बरोबर आहेत . आज गुहागर मध्ये दिव्यांग वाढण्याचे प्रमाण हे वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसणे हेच आहे . ग्राम आधार संस्थेने ह्या क्षेत्रात उतरण्याचा मुख्य उद्देश हाच होता की लोकांमध्ये दीव्यांगा बाबत जागृती करणे , वैद्यकीय व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करणे . हे सर्व लक्षात घेऊनच संस्थेने विशेष शाळा हा उपक्रम सुरू केला . आता ह्या मध्ये अनेक जणांचे प्रश्न असतील की इतके दिव्यांग प्रकार असून संस्थेने बौद्धिक अक्षम ह्या मुलांचीच शाळा का सुरू केली . ह्या मागचे उद्देश हे आहेत की बौद्धिक अक्षम , ऑटीझम ह्या अवस्थेतील मुले इतर विद्यार्थ्या प्रमाणे शाळेत शिक्षण घेऊ शकत नाहीत म्हणून संस्थेने बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांना शिक्षण व वैद्यकीय सुविधा सर्व दिव्यांगासाठी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु पाहिले समजून घेऊ शिघ्र तपासणी का महत्त्वाची असते .....
१) शीघ्र तपासणी , निदान करणे व त्या वरील उपचार:
शिशू कालावधीत निदान करणे कठीण आहे , जर निदान झाले तर त्वरित उपचार करणे गरजेचे आहे
पण ही बाब लक्षात न येणे , दिव्यांगत्वाची भीषण समस्या ओळखू न येणे , आणि ओळखता आली तर त्या वर उपचार , शस्त्र क्रिया विविध थेरपी चालू करणे या बाबी महत्त्वाच्या असतात . जर तज्ञां कडून ह्या गोष्टी पालकांच्या लक्षात आणून दिल्या तरी बऱ्याच पालकांची स्वीकारण्याची मानसिकता नसते . परंतु ही सुविधा वयाच्या पहिल्या वर्षापासून उपलब्ध झाल्या तर भविष्यातील भीषण समस्या ६०% ते ७०% कमी करता येऊ शकते . ज्यांचा बुध्यांक ७०% ते ८०% पेक्षा अधिक आहे ते जास्त आनंदी जीवन जगू शकतात. अनेक दिव्यांगत्वावर अत्याधुनिक शस्त्र क्रिया , विविध थेरपी उपलब्ध आहेत . आज ह्या मध्ये जीवन ज्योती विशेष शाळेत फिजिओथेरपि , स्पीच थेरपी , ऑक्कुपेशनल थेरपी , योगा अश्या सुविधा सुरू केल्या आहेत . परंतु अजून अनेक सुविधा आहेत ते नवीन इमारतीत सुरू करण्याचा मानस आहे .
२) कौटुंबिक पातळीवरील आव्हान :
दिव्यांग व्यक्ती केवळ सामाजिक दृष्ट्या वंचित आहे असे नव्हे, काही कुटुंबात ती दुर्लक्षित असते . जुन्या काळात संयुक्त कुटुंब पद्धती होती त्यामुळे दिव्यांगांकडे
लक्ष देण्यासाठी आजी आजोबा , काका काकू असायचे .
परिवार मोठा असायचा . त्यांच्या भोजनाकडे किंवा प्रकृती कडे लक्ष असायचे . आर्थिक दृष्टया दुर्बल कुटुंबातील दिव्यांगांची आणखीनच बिकट परिस्थिती आहे . आणि ही परिस्थिती गुहागर मध्ये आपणास बघायला मिळते . दिव्यांगांमध्ये जर मुलगी असेल तर तिच्या कडे अधिक नकारात्मक दृष्टीने बघितले जाते . वर्तमान आणि भविष्यतील विभक्त कुटुंब पद्धतीमुळे या समस्येत आणखी भर पडू शकते . दिव्यांग कुटुंबामध्ये दिव्यांग व्यक्तीची स्वीकारता नसणे , व स्वतः च्या दिव्यांग मुलांच्या विकासासाठी विविध मार्ग माहिती नसणे याचे गाढ अज्ञान आहे . पालकांची स्वीकारता नसल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. क्षमता नसतानाही अनेक अपेक्षा बालका कडून केल्या जातात. आपले मूल वेगळे आहे असे नातेवाईक व मित्र मंडळींना वाटले तर आपल्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन समाजाचा कसा असेल ? अशी भीती पालकांमध्ये निर्माण होते . अंधश्रद्धेपोटी नको ते नवस करण्या मध्ये पालकांचा वेळ जातो . ह्या मध्ये त्याला वेळेवर मिळणाऱ्या उपचार पद्धतीने वंचित राहतो . त्यामुळे शीघ्र तपासणी मध्ये त्याचे कमी होणारे दिव्यांगत्व वेळ निघून गेल्यावर कमी
होत नाही . परंतु तरी सुध्दा शाळा त्यांच्या साठी प्रयत्न चालू ठेवते . ही कुटुंबीय समस्या गुहागर मध्ये नाही तर अनेक ठिकाणी पाहायला मिळते...
३) प्रशासनाचे प्राधान्यक्रम :
० ते ६ वयोगटात विशेष गरजा असलेल्या बालकांत सरकारी अंगणवाडी ( बालवाडी ) किंवा तत्सम ठिकाणी सुविधा नसतात . खरे तर दिव्यांग बालकांच्या प्रगतीच्या दृष्टीने हा वयोगट अत्यंत महत्वाचे असते . निरपेक्ष भावनेने काम करणारे शासकीय कर्मचारी, जिल्हा परिषद चे शिक्षक , श्रेष्ठ अधिकारी व मोजक्या उत्तम प्रकारे कार्य करणाऱ्या संस्था चालकांची माफी मागून असे म्हणावेसे वाटते की , प्रशासनातील भ्रष्ट व्यवस्था , जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व काही स्वार्थी संस्था चालक हे मोठे आव्हान आहे . शीघ्र गतीने व उपचार हा आरोग्य विभागाचा आणि तपासणी नंतर ज्या मुलांचा शोध लागला अशा विशेष गरजा असलेल्या बालकांचे पुनर्वसन समाजकल्याण विभागाचा विषय आहे . स्पष्ठता नसल्याने त्या दृष्टीने योजना किंवा रचना नाही . त्या करिता जीवन ज्योती विशेष शाळेत स्व विचाराने ही शीघ्र तपासणी सुविधा उपलब्ध केली
आहे .
४) १८ वर्षांवरील मुलांच्या समस्या :
१८ वर्षांवरील दिव्यांग विद्यार्थ्यांना १० वी नंतर शिक्षणाची पर्याप्त सोय उपलब्ध नाही . दिव्यांगांच्या दृष्टीने महाविद्यालये, तंत्र प्रशिक्षण, कौशल्य प्रशिक्षण केंद्र शासनाने सुरू करण्याच्या विचारात नाही . पण काही खाजगी संस्था त्यांच्या क्षमते प्रमाणे कार्य करीत आहे . परंतु त्यामध्ये संशोधन , स्वयं रोजगार यावर विचार झाला आहे का ? अशा केंद्रसाठी विचार गंभीरपणे शासन स्तरावर होणे अत्यावश्यक आहे . व्यावसायिक उद्योजकांनी त्यांच्या सीएसआर स्तरावर काही मॉडेल निर्माण करण्याची आवश्यकता आहे .
हे असंघटीत , वंचित घटक आहेत , कायद्याने आणि नैतिकतेने या घटकांना प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे . समाजातील प्रतिष्ठित, प्रतिभावान आणि प्रस्थापित लोकांनी दिव्यांग व्यक्तीकडे केवळ सहानुभूतीने न पाहता आपल्या संपूर्ण वेळतील किमान ५% वेळ जरी या कार्यासाठी दिला तरी या क्षेत्रातील सर्व विषयांच्या कार्याला गती प्राप्त होऊ शकते .....
Product Order / Enquiry
Your product purchase interest motivates our special student