निधी संकलन करून / देणगी स्वरुपात जीवन विशेष शाळेला का द्यावे ?
हा विषय अनेक व्यक्तींच्या मनात येणे साहजिक आहे . ग्राम आधार हा विषय ह्या करिता मांडत आहे कारण आत्ताच्या काळात प्रत्येक व्यकी देणगी देताना आपण दिलेली रक्कम खरच योग्य कामासाठी होत आहे ना ? हा प्रश्न देणगी देताना प्रत्येकाच्या मनात येणे साहजिकच आहे . आत्ताच्या काळात एनजीओ मध्ये अनेक ठिकाणी पैशांचा गैरवापर पुढे येत आहेत , तसेच अनेक ठिकाणी संस्था निधी मात्र घेते पण काम मात्र होताना दिसत नाही . त्या मुळे देणगी देताना आम्ही काय काम करतो कुटे करतो ह्याची सर्व माहिती उपलब्ध आहे.
ग्राम आधार संस्था अनेक वर्ष गुहागर मध्ये काम करते हा भाग आर्थिक आणि वैद्यकीय दृष्ट्या सक्षम नाही आहे . संस्थे अंतर्गत चालवण्यात येणारी शाळा अपंग कल्याण आयुक्तालय पुणे, महाराष्ट्र यांची मान्यता जरी असली तर सरकारकडून कोणत्याही स्वरूपाचे अनुदान मिळत नाही . गुहागर तालुका वैद्यकीय दृष्ट्या सक्षम नसल्याने आपल्या तर्फे देण्यात येणारी देणगी त्यांच्या थेरपी व epilepsy साठी मिळणारी महाग औषधे या साठी उपयोग करता येईल.
तसेच संस्थेने सुरू केलेली शाळा भाड्याच्या जागेत चालवीत असताना विद्यार्थ्यांची वाढती संख्या व थेरपी करिता पडणारी अपुरी जागा याकरिता शाळा बांधकाम करण्यासाठी जागा बघितली असून खरेदीचे व्यवहार चालू आहे . परंतु शाळा बांधकाम ह्या करिता लागणारी मदत मोठी असून त्या साठी आपण देणगी देऊ शकता . परंतु देणगी द्यायच्या आधी संस्थेशी संपर्क करून सर्व पडताळणी करून घ्यावी . नवीन शाळा बांधकाम झाल्यास मुलांना अजून छान खेळकर पणे शिकता येईल स्वतंत्र वैद्यकीय सुविधा सुरू होतील . महत्वाचे म्हणजे फिजिओथेरपी, occupational therapy . ह्या थेरपी इतक्या महत्त्वाच्या आहेत की कोकण भागात फारच कमी occupational therapist असून रत्नागिरी मध्ये रत्नागिरी जिल्हा रुग्णालय व गुहागर जीवन ज्योती विशेष शाळा येथे उपलब्ध आहे.
जर स्वतंत्र इमारत झाल्यास ३ तालुके दापोली , खेड , चिपळूण यांना ही ह्या सुविधेचा उपयोग होईल व उपचाराकरिता तेथे राहण्याची व्यवस्था ही होऊ शकते . या उपक्रमातून विशेष मुलांना त्यांचे छान चांगले आयुष्य जगता येईल व स्वतःच्या पायावर उभे राहून त्यांना स्वावलंबन बनवणे हाच उद्देश .आपण आमच्या उपक्रमाला भेट देऊ शकता .....किंवा संपर्क करून माहिती जाणून घेऊ शकता...
Product Order / Enquiry
Your product purchase interest motivates our special student